महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा महापारीनिर्वाण दिन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय येथे संपन्न
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय सिन्नर येथे, राष्ट्रीय सेवा योजना द्वारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा महापारीनिर्वाण दिन संपन्न झाला . यावेळी विद्यार्थी मयूर जाधव , आकाश माळी मनोगत व्यक्त केले.
प्रा.राजश्री बागुल, प्रा.धनश्री गांगुर्डे ,प्रा. महेश शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जीवन कार्याविषयी विचार मांडले. प्रा.डॉ. विनोद निरभवणे प्रभारी प्राचार्य यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बाबासाहेबाच्या सामाजिक आर्थिक व राजकीय कार्याबाबत विद्यार्थ्यना माहिती दिली . आजच्या सामाजिक आर्थिक बाबी सुधारण्याचा पाया डॉ. बाबासाहेबानी घातला आहे. तो म्हणजे भारतीय राज्यघटना होय.यामुळे प्रत्येक भारतीयाचे जीवनमान आधुनिक मुल्य व विचारांनी प्रेरित झाले आहे . असे विचार डॉ. विनोद निरभवणे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजश्री बागुल व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. महेश शिंदे यांनी आभार मांडले. यावेळी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.