विद्यार्थ्यांना कौशल्यात्मक शिक्षण ही काळाची गरज
डॉ. नितीन जाधव यांचे प्रतिपादन
पिंपळगाव बसवंत : ५.२.२०२४
आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. जो विद्यार्थ्यी अधिकाधिक कौशल्य प्राप्त करतील तेच विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. शिक्षण आणि प्रशिक्षण या भिन्न कल्पना आहे. आज शिक्षण जसे आवश्यक आहे तसे प्रशिक्षनात्मक शिक्षण घेणे हे देखील महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात येणारी आव्हाने वेगळी आहे. नोकरीच्या ठिकाणी गुणात्मक दर्जाबरोबर कौशल्यपूर्ण कौशल्यात्मक शिक्षण पूर्ण करणे हे आपल्या यशाचे गमक आहे. म्हणून विद्यार्थ्यांना कौशल्यात्मक शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी केले. ते मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथे आयोजित महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, Management Entrepreneurship professional Skill Council, New Delhi. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर साताभाई, प्रा. नामदेव गावित, प्रा. भगवान कडलग, हर्षल रोटे, मयूर रोटे, भूषण गवळी, श्रीमती योगिता शेळके, श्रीमती पी. बी. बिरारी, डॉ.संतोष दळवी, डॉ. साहेबराव मोरे, प्रा. विनय कदम आदी उपस्थित होते.
यावेळी नुकतीच पी.एस.आय ची परीक्षा पास केलेले पिंपळगावचे भूमिपुत्र हर्षल रोटे यांनी आपले स्वनुभव कथन केले. तसेच यावेळी मयूर रोटे, भूषण गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले, आजच्या आव्हानात्मक युगात विद्यार्थ्यांना समर्थपणे सामोरे जाता यावे यासाठी संस्था व महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम, प्रशिक्षण आयोजित करत असते त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे विचार त्यांनी मांडले. हे प्रशिक्षण महाविद्यालयात १० दिवस चालणार असून या प्रशिक्षणासाठी १,००० विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. भगवान कडलग यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सातभाई यांनी केले तर आभार प्रा. विनय कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.