क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी तसेच मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. मंगल सांगळे यांनी मराठी भाषेबद्दल आपण आंतरिक जिव्हाळा दाखवण्याची गरज असल्याचे सांगितले. मराठी भाषा अभिजात झाली असली तरी काळाच्या ओघात मराठीचे प्रभुत्व कमी होणार नाही याबाबतची काळजी आपण घेणे खूप गरजेचे आहे, असे यावेळी त्या बोलत होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी शिंदे हिने देखील मराठी भाषेबद्दलचा आपला अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी मराठी अस्मिता जपली जाणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक अधिकारी सहा. प्रा. पूनम कुटे, परीक्षा विभाग प्रमुख सहा. प्रा. संतोष आव्हाड, क्रीडा विभाग प्रमुख स. प्रा. अमोल आव्हाड IQAC समन्वयक सहा. प्रा. ज्ञानेश्वर चकोर व इतर प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. सारिका नागरे यांनी केले तर सहा. प्रा. स्वाती चोथवे यांनी आभार व्यक्त केले.