सिन्नर येथील KVN नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा

सिन्नर येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड हे अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या संचालिका नंदा भाबड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी डॉ. वंदना सांगळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रा. ज्ञानेश्वर चकोर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालयाचे तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थिनी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. मंगल सांगळे यांनी केले तर आभार प्रा. स्वाती चोथवे यांनी व्यक्त केले.