कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान जनजागृती उपक्रम
विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा एनएसएस विभाग व देवळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लोकशाही अधिक बळकट व्हावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोग यांनी स्वीप उपक्रम सुरू केला असून त्या माध्यमातून मतदान जनजागृती केली जात आहे. महाविद्यालयातील नव मतदार स्वयंसेवकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून निवडणुकी संबंधीचे सर्वसामान्य प्रश्न विचारून अधिक मतदानासाठी मतदारांना उद्युक्त करावे हे यामागील प्रयोजन होते.
देवळा नगरपंचायतच्या वतीने प्रथम तीन विजेत्या गटातील स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.तसेच महाविद्यालय ते देवळा पाच कंदील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी देवळा सतिष बच्छाव , वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. एन. निकम, एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन भामरे ,डॉ. राकेश घोडे सह सर्व प्राध्यापक, देवळा नगरपंचायत चे लेखापाल नितीन भवर, लेखापरीक्षक जुगल घुगे, स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, नगररचनाकार अपूर्वा डोळे, शहर समन्वयक दिग्विजय देवरे, व स्पर्धक विद्यार्थी, सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.