प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय निफाड येथील उपक्रमशील प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि निसर्ग संवर्धन विषयक उत्कृष्ट कार्याची दाखल घेत, त्यांना अहिल्यानगर शिर्डी येथील "बी द चेंज" फाउंडेशन च्या तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. ह्या पुरस्कार वितरण समारंभासाठी मा. ओमप्रकाश दादाप्पा कोयटे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघ), हिवरे बाजार येथील प्रसन्न पोपटराव पवार, पुणे येथील उद्योजक श्री. कापे, फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, उपाध्यक्ष अभिषेक तुपे, संयोजक अक्षय आव्हाड, उद्योजक अमृत रोहम आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यभरातून एकूण १३१० नामांकने प्राप्त झाली होती, त्यापैकी फक्त ३६ जणांची निवड करण्यात आली.
डॉ. ढगे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका सौ. शोभाताई भागवत बोरस्ते, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. उत्तमराव डेरले, सर्व प्राध्यापक वृंद आणि आप्तेष्ट नातेवाईक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत...
======================================================================================