श्री सप्तशृंगी महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर संपन्न

श्री सप्तशृंगी महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अंड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दहिदुले ता- बागलाण, जि- नाशिक येथे१०/०१/२०२५ ते १६/०१/२०२५ या दिवसी युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लेटरसी या संकल्पनेतून विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी गावाचे ‌ग्रामसेवक राहुल निकम, सरपंच श्रीमती सुरेखा कौतिक साबळे व मा.नितीन साहेबराव ‌देशमुख प्रशासकीय अधिकारी सटाणा हजर होते व कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजय पंडितराव सोनवणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती व संस्थापक अध्यक्ष या कार्यक्रम प्रसंगी हे पण हजर होते. मा. संस्थेचे अध्यक्ष संजय पंडितराव सोनवणे यांनी युवकाचा ध्यास ग्राम शहर विकास व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती तसेच युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेतून स्वच्छता चे महत्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात पटवून सांगितले प्रमुख अतिथी मा. नितीन साहेबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी, बालविवाह यावर मार्गदर्शन केले तसेच समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रमुख अतिथी माननीय सुशील कुमार संजय सोनवणे सरचिटणीस तुळजाभवानी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी यांनी युथ फॉर माय भारत याविषयी मार्गदर्शन केले तसेच मा.सचिन उत्तमराव पाटील विश्वस्त यांनी युवकाचा ध्यास यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक राजाराम नाडेकर यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना बाविस्कर यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी पत्रकार मंडी, गायत्री पवार विद्यार्थिनी प्रतिनिधी, लोकेश मोरे विद्यार्थी प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ जिल्हा परिषद शिक्षक, पदाधिकारी व कर्मचारी व गावातील गावकरी प्राध्यापक व कर्मचारी स्वयंसेवक स्वयंसेविका या कार्यक्रमासाठी हजर होते .