अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आयोजित वॉकेथॉन कार्यक्रम

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आयोजित वॉकेथॉन कार्यक्रम
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकर आयोजित वॉकेथॉनसाठी चालताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा केंद्रीय जनजातीय कार्य राज्यमंत्री, भारत सरकार श्रीमती डॉ. भारती पवार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, , प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील कार्यकारी संचालिका इनोशी शर्मा, प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी, कृष्णा मेथेकर, मविप्र संचालक शिवाजी गडाख,महिला संचालिका शोभाताई भागवत बोरस्ते, श्री भागवतबाबा बोरस्ते, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष
निरोगी आयुष्य हीच जीवनाची संपत्ती
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आयोजित वॉकेथॉन कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन
वॉकथॉनमध्ये हजारोच्या संख्येने पिंपळगावकर सहभागी
पिंपळगाव बसवंत : १२.२.२०२४
            शरीर स्वास्थ्यासाठी चालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर निरोगी असण्यासाठी नियमित चालणे, शरीरासाठी उत्तम व्यायाम आवश्यक आहे. चालण्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे आणि म्हणून ज्यांना कठीण व्यायाम करणे शक्य नाही किंवा त्यासाठी वेगळा वेळ काढता येत नाही अशा व्यक्ती रोजच्या व्यायामात चालण्याचा समावेश करावा. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनात उत्तम आरोग्य हेच खरे सुखाचे मूळ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा केंद्रीय जनजातीय कार्य राज्यमंत्री, भारत सरकार श्रीमती डॉ. भारती पवार यांनी केले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्र यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव प्रांगणात आयोजित केलेल्या उत्साहवर्धक वॉकेथॉन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यापीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील कार्यकारी संचालिका इनोशी शर्मा, प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी, कृष्णा मेथेकर, मविप्र संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका शोभाताई भागवत बोरस्ते, भागवतबाबा बोरस्ते,  स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे,  महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुख्याध्यापक प्रदीप धुळे, मुख्याध्यापिका शिल्पा धारराव, सोनालीराजे पवार,  सुनील पवार, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होते.   
डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, व्यस्त रहा आनंद मिळावा, व्यायाम करा स्वस्थ रहा. योग हे जीवनाचे सार आहे. योगाभ्यास हा भारताबरोबर जागतिक स्तरावर त्याचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी योग आपण केला पाहिजे. 
           यावेळी वॉकेथॉन निमित्ताने निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पोस्टर्स स्पर्धा पहिला गट प्रथम क्रमांक देवश्री भालेराव, द्वितीय क्रमांक तंजीर शेख, तृतीय अस्मिरा लतीफ शेख, निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक तनुश्री जाधव, द्वितीय क्रमांक देवश्री भालेराव, तृतीय क्रमांक आनवी ढगे, प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक सानिका गवळी, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या घुमरे, क्रमांक तनुश्री जाधव, गट क्रमांक दोन पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक वैष्णवी बनकर, द्वितीय क्रमांक कृष्णा ढिकले, तृतीय क्रमांक तन्वी ढिकले, निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक श्याम साळुंखे, द्वितीय क्रमांक वैष्णवी बनकर, तृतीय क्रमांक श्रद्धा महाले, प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक गुंजन तिडके, द्वितीय क्रमांक आर्या तिडके, तृतीय क्रमांक आर्यन मोरे, तृतीय गट पोस्ट स्पर्धा प्रथम क्रमांक पेठे सोनाली, द्वितीय क्रमांक संधान सलोनी, तृतीय क्रमांक शिरसाट कल्याणी, निबंध लेखन प्रथम क्रमांक पेठे सोनाली, द्वितीय क्रमांक धोत्रे साहिल, तृतीय क्रमांक पगारे पायल, प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक तिडके वरद, द्वितीय क्रमांक शिंदे कांचन, तृतीय क्रमांक देशमुख पारस यांना प्राप्त झाला.
         या वॉकथॉनसाठी मविप्र क. का. वाघ. महाविद्यालय मैदान - स्टेट बँक ऑफ इंडिया- निफाड फाटा – बस स्थानक- ऋचा हॉटेल - उंबरखेड रोड कर्मवीर गणपत दादा मोरे विद्यालय प्रवेशद्वार  असे एकूण ३ की.मी. अंतर ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे पिंपळगाव नाजिक असलेल्या शाळा व मोठ्या संख्येने पिंपळगाव बसवंतच्या तरुण, वृद्ध नागरिकांनी उस्फुर्त सहभाग यामध्ये नोंदविला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फसाईचे (FSSAI)विभागीय   संचालिका प्रीती चौधरी  यांनी केले. व आभार कृष्णा मेथेकर  यांनी मानले. या कार्यक्रमाला मुंबई बी ग्रुपचे महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कमांडिंग ऑफिसर मेजर सतीशकुमार शेखावत यांचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर ग्रामस्थ शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, बचत गट बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
FSSAI पश्चिम क्षेत्रातर्फे आयोजित FSSAI च्या इट राइट उपक्रमाच्या स्मरणार्थ वॉकथॉनमध्ये, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांच्यासाठी येथे काही मुद्दे आहेत: 
 
1.   पोचपावती आणि कृतज्ञता  : सहभागी, आयोजक, स्वयंसेवक आणि समर्थकांसह, इट राइट उपक्रमाद्वारे आरोग्य आणि पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता.
 2.   शारीरिक क्रियाकलापांचे महत्त्व: निरोगी जीवनशैली राखण्यासाठी शारीरिक हालचालींच्या महत्त्वावर जोर द्या. वॉकेथॉन सारखे उपक्रम लोकांना नियमित व्यायामासाठी कसे प्रोत्साहित करतात, जे सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक आहे.
 3.   व्यायाम आणि पोषण यांच्यातील दुवा: व्यायाम आणि पोषण यांच्यातील सहजीवन संबंधांवर चर्चा करा. नियमित शारीरिक हालचालींसह संतुलित आहार आरोग्याच्या चांगल्या परिणामांमध्ये कसा हातभार लावतो आणि जुनाट आजारांचा धोका कमी करतो.
 4.   FSSAI ची भूमिका: अन्न सुरक्षा, पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या प्रयत्नांना मान्यता द्या. सुरक्षित आणि पौष्टिक अन्न सेवन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी FSSAI द्वारे विशिष्ट उपक्रम आणि कार्यक्रम सुरू केलेले आहेत.
 5.   योग्य खा मोहीम (Eat Right India Initiative): योग्य खा मोहिमेचे विहंगावलोकन आणि त्याची उद्दिष्टे द्या. या मोहिमेचे उद्दिष्ट नागरिकांना माहितीपूर्ण अन्न निवडी करण्यासाठी आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी अंगीकारण्यासाठी सक्षम बनवण्याचा आहे, शेवटी देशाच्या एकूण आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी या मोहिमेचे मौल्यवान योगदान आहे.
 6.   समावेशकता आणि प्रवेशयोग्यता: समाजातील सर्व घटकांसाठी निरोगी अन्न पर्याय सुलभ आणि परवडणारे बनविणे महत्वाचे आहे. अन्न असुरक्षिततेचे निराकरण करण्यासाठी धोरणांवर चर्चा करा आणि सामाजिक-आर्थिक स्थितीची पर्वा न करता प्रत्येकासाठी पोषक अन्न उपलब्ध असले पाहिजे.
7.   समुदाय प्रतिबद्धता: इट राइट उपक्रमाला चालना देण्यासाठी समुदायाच्या सहभागाची महत्वाची भूमिका आहे. वॉकेथॉन सारख्या इव्हेंट्समुळे समुदायाची भावना वाढते आणि निरोगी आणि अधिक टिकाऊ भविष्यासाठी सामूहिक कृतीला प्रोत्साहन मिळते.
 8.   कॉल टू ॲक्शन: सहभागींना त्यांच्या आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीच्या निवडींमध्ये छोटे परंतु प्रभावी बदल करून इट राइट मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना त्यांच्या समुदायांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी प्रोत्साहित करा आणि निरोगी जीवन जगण्याचे समर्थन करा.
 9.   सतत पाठिंबा आणि सहयोग  : आरोग्य आणि पोषणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुढाकार घेण्याच्या सरकारचे वचन. सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारी संस्था, खाजगी क्षेत्रातील भागीदार, नागरी समाज संस्था आणि व्यक्ती यांच्यातील सहकार्याच्या महत्व.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकर आयोजित वॉकेथॉनसाठी फ्लग ऑफ करताना  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा केंद्रीय जनजातीय कार्य राज्यमंत्री, भारत सरकार श्रीमती डॉ. भारती पवार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील कार्यकारी संचालिका इनोशी शर्मा, प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी, कृष्णा मेथेकर, मविप्र संचालक शिवाजी गडाख,महिला संचालिका शोभाताई भागवत बोरस्ते, भागवतबाबा बोरस्ते, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे,  महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुख्याध्यापक प्रदीप धुळे, मुख्याध्यापिका शिल्पा धारराव, सोनालीराजे पवार, सुनील पवार, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील आदी.