नव्या पिढीला मराठी संस्कृती रुजविण्यासाठी मराठी शाळा फार आवश्यक - रोहन देशपांडे

नव्या पिढीला मराठी संस्कृती रुजविण्यासाठी मराठी शाळा फार आवश्यक -  रोहन देशपांडे

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन मराठी शाळेच्या बालमोहन उत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मिलिंद कचोळे, तर प्रमुख पाहुणे  भारतीय जनता पक्षाचे बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदेश सह संयोजक श्री रोहन देशपांडे, गौरी बुरकुले उपस्थित होते.  अध्यक्षांनी बारा बलुतेदार योजना विद्यार्थी दशेत कशी राबवता येईल यासाठी मार्गदर्शन केले. तर  आपल्या मुलांनी मातृभाषेत शिक्षण का घेतले पाहिजे ? मराठी शाळांना सद्याची आधुनिकता समजून कशी “कात” टाकली पाहिजे यांवर रोहन देशपांडे मनोगत व्यक्त करताना  मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शाळांची भौतिक स्थिती सुधारण्यासाठी  माजी विद्यार्थ्यांनी  नवीन मराठी शाळेला यथाशक्ती सहकार्य करण्यासाठी आवाहन केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सुसंस्कृत करण्यास प्राधान्य देऊन मराठी शाळा वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन मराठी माणसाला जागृत करू अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.गौरी बुरुकुले यांनी माजी विद्यार्थी म्हणून शाळेला आर्थिक मदत म्हणून धनादेश सुपूर्त केला. यावेळी व्यासपीठावर   अधिक्षिका सौ. सविता कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ. मंगला गोविंद  तर विद्यार्थी मित्र,शिक्षकवृंद , पालक आदि हे उपस्थित होते.सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तर डूमरे यांनी आभार मानले.