शिखरेवाडी किंवा गंधर्वनगरी भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना नागरिकांचे साकडे

शिखरेवाडी किंवा गंधर्वनगरी भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना नागरिकांचे साकडे

नाशिक (प्रतिनिधी) :

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री मा. ना. श्री. योगेश जी कदम साहेब यांना कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापित करणेबाबत रोहन देशपांडे यांनी निवेदन दिले.

यावेळी गणेश कदम, विक्रम कदम, प्रशांत पाटील, संदीप कदम, विजय कदम, यश बच्छाव, लकी ढोकणे आदी उपस्थित होते.

नाशिकरोड मधील प्रभाग क्रमांक २० हा एक सर्वच दृष्टीने मोठा प्रभाग आहे.

या प्रभागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहेच पण दोन्ही नोट प्रेस, न्यायालय, मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे आयुक्त कार्यालय, अनेक शाळा कॉलेजेस यामुळे मोठ्या प्रमाणावर २४ तास लोकांचा वावर असतो.

त्यामुळे येथे २४ तास कार्यरत पोलिस चौकी स्थापित झाल्यास वाढते अपघात, गुन्हेगारी यावर प्रतिबंध येऊन नागरीकांना मोठा दिलासा मिळेल. सर्व नागरीकांचे वतीने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदनात करण्यात आली.