प्रभाग २४ मध्ये काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न - मा. नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश

प्रभाग २४ मध्ये काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न - मा. नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या  पाठपुराव्याला  यश

नविन नाशिक, १९ एप्रिल: जुने सिडको परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी! प्रभाग २४ मधील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

या महत्त्वपूर्ण कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आणि मा.ना.दादाजी भुसे साहेब यांचे सहकार्य लाभले आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक मा. प्रविण (बंटी) तिदमे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

या अंतर्गत महाराणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक, डॉ. वाडेकर समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बडदे नगर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, पारख इलेक्ट्रॉनिक्स ते डेक्कन पेट्रोल पंप कॉर्नर या मार्गावरील डांबरी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे; विशेष म्हणजे, तिदमे यांच्या संकल्पत्नेतून या या मार्गाचे काँक्रिटीकरण व्हाईट टॉपिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार असून, नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर होत आहे. यामुळे केवळ रस्त्याचा खर्च कमी होणार नाही, तर भविष्यातील देखभालीसुद्धा सुलभ होणार आहे. खराब झालेल्या रस्त्याच्या विशिष्ट भागाची दुरुस्ती शक्य होणार असून, मनपाची मोठी आर्थिक बचत होणार आहे.

कार्यक्रमस्थळी संदीप वाघ, शेखर देशमुख, बाळा पाटील, पंकज बोरसे, लकी पटेल, अनिल रिकामे, हेमंत कोठारी देवेंद्र रहाणे, रवी जाधव, सुभाष लचके, महेश मटकर, संदीप भोसले, सचिन भोसले, पप्पू राख, चेतन चांदवडकर, पिंटू खालकर, मनोज खैरनार, संजय पवार, निलेश काळोगे, नीता थोरात, सुनीता गायकवाड, चौधरी काकू, शारदा परदेशी, तांबोळी वहिनी, प्रवीण अहिराव, मथुरे काका, हेमंत वैद्य, धनश्री नाना आदी स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.