श्री सप्तशृंगी महाविद्यालयात हुतात्मा दिन उत्साहात साजरा.

तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या मोहनदास करमचंद गांधी या हुतात्म्याच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 'हुतात्मा दिन' साजरा करण्यात आला.
प्रथम महात्मा गांधीच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग महादू जाधव यांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमानिमित्त दोन मिनिटं स्तब्धता पाळून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे असे मत महात्मा गांधी यांचे होते देशाला शिक्षणाची देणगी देणारे महात्मा गांधींच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचावा शिक्षकाने तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा यासाठी हुतात्मा दिन 30 जानेवारी 2025 ला महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त प्राध्यापक आर.डी नाडेकर (राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख) व शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी हजर होते