पहलगाम हल्ल्यानंतर उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तातडीचा पुढाकार – नाशिकच्या शिवसेनेच्या मदतीने पर्यटकांची सुखरूप सुटका!

पहलगाम हल्ल्यानंतर उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तातडीचा पुढाकार – नाशिकच्या शिवसेनेच्या मदतीने पर्यटकांची सुखरूप सुटका!

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. या कठीण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि नाशिक महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, शिवसेना विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोल यांनी तातडीने पुढाकार घेतला व सर्व कुटुंबीयांना सुखरूप परत आणण्यात शिवसेनेच्या मदत कार्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

सुरक्षित परतलेले नागरिक: रवींद्र दराडे, दिपाली दराडे,  श्रुतिका दराडे, कृतिका दराडे, रोहिदास वामन फडोल, स्वाती फडोल, राशी फडोल, श्रीश फडोल, कांचन फडोल, शौर्य फडोल, स्वप्नील लक्ष्मण मणकर, पूजा मणकर, शौर्य मणकर, पार्थ मणकर, ज्ञानेश्वर गाटकल, वैष्णवी गाटकल, श्लोक गाटकल, आनंद डारगुडे

या मदत कार्याबद्दल सर्व कुटुंबीयांनी उप-मुख्यमंत्री शिंदे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि प्रविण तिदमे यांचे आभार मानले, आणि संकटाच्या काळात “आपला माणूस आपल्या सोबत उभा आहे” ही भावना व्यक्त केली.