दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे 300 अपंगाना साहित्य वाटप

दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे 300 अपंगाना साहित्य वाटप
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे दिव्यांग बांधवांना वस्तूंचे वाटप करताना व्यवस्थापकीय संचालक दीपक चंदे, दीपा चंदे, समवेत राजेंद्र भंडारी, किशोर माने, प्रवीण येवले, तृप्तीदा काटकर, सुहासिनी घोडके, सागर मोटकरी, हेमंत दंदणे, नंदकिशोर नगरकर, बाळासाहेब दंदणे आदी.

जागतिक अपंग दीन : दिव्यांग मुलांचे उत्तम सादरीकरण

नाशिक : नाशिक रोड येथील विकास कर्णबधिर विद्यालयाचा विद्यार्थी जहीर याने सादर केलेले जादूचे प्रयोग आणि दीव्यांग मुलांनी सादर केलेल्या कलागुणांमुळे उपस्थित मुग्ध झाले. निमित्त होते जागतिक अपंग दिनानिमित्त दीपक बिल्डर्स यांच्या वतीने आयोजित 300 दिव्यांग बांधवांना करण्यात आलेल्या साहित्य वाटप कार्यक्रमाचे. यावेळी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष किशोर माने, दीपा चंदे, प्रवीण येवले, ज्येष्ठ नागरिक संघाचे राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे राजेंद्र भंडारी यांनी हास्य योगावर आधारित प्रात्यक्षिक सादर केले. यानंतर दीपक चंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये व्हीलचेअर, वॉकर, गॉगल, काठी यांसह इतर साहित्याचा समावेश होता. सुमारे 300 दिव्यांग बांधवांना दीपक चंदे व मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. वृक्षवल्ली संस्थेच्या तृप्तीदा काटकर यांनी सूत्रसंचालन केले. विकास कर्णबधिर विद्यालयाच्या शिक्षिका सुहासिनी घोडके यांनी या उपक्रमाबद्दल चंदे यांचे आभार मानले. उपस्थित दिव्यांग बांधवांना यावेळी स्वेटर आणि कान टोपीचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये सुमारे 17 दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. भावविवश झालेल्या विद्यार्थ्यांनी उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. मुंबई, पुणे, नांदेड यासह नाशिकचे दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते.