१६ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

१६ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिक | १६ जुलै २०२५ :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि आयमा (AIMA) इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने "जागतिक युवा कौशल्य दिन" निमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा दिनांक १६ जुलै २०२५ रोजी पी-२१, आयमा रिक्रेएशन सेंटर, अंबड एमआयडीसी, नाशिक येथे होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा लि., बजाज सन्स लि., साईको क्रेन्स प्रा. लि., पीएमईए सोलर टेक सोल्युशन, अंबर फोर्ब्स प्रा. लि., सप्तश्रृंगी इंटरप्रायझेस, त्रिमूर्ती फर्नेस प्रा. लि., अल्फाटेक प्रोसेस अँड इक्विपमेंटस प्रा. लि., प्रेस मेटल इंडस्ट्रीज, अथर्व मॉड्युल्स प्रा. लि., हिंदुस्थान हार्डवेअर लि. अशा ११ पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. ४१५ पेक्षा जास्त रिक्त पदांकरिता थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री इंजिनिअर यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असून विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी हे रोजगार मेळावा खुला आहे.

स्वयंरोजगार संधीही उपलब्ध :

रोजगारासोबतच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉलही या ठिकाणी असतील. विविध कर्ज योजना आणि मार्गदर्शनाची माहिती देखील मिळणार आहे.

नोंदणी अनिवार्य :

उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी व लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी nashikrojgar@gmail.com0253-2993321 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. ही मोफत सेवा असून जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. वि.रा. रिसे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक यांनी केले आहे.

=========================================================================================================

advertisement

for joining fill the form   https://forms.gle/6X6BhB5sx9tNqyAe9