कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मुर्तीदिना निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
देवळा - रक्तदानाने असंख्य लोकांचा जीव वाचविता येतो या भावनेतून ८५ रक्तदात्यांनी देवळा एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन महाविद्यालयाचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मुर्तीदिना निमित्ताने व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रक्तदान केले. कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक व रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. देवळा एज्युकेशनचे चेअरमन प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे देवळा तालुका संचालक विजय पगार, माजी संचालक डॉ. विश्राम निकम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, रोटरी क्लब देवळा टाऊनचे अध्यक्ष राकेश शिंदे, सेक्रेटरी डॉ. सुनिल आहेर, डॉ. सतीश ठाकरे, उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाणे, उपप्राचार्य आर. एन. निकम, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. राकेश घोडे, लेफ्टनंट बादल लाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एन सी सी विभागाने केले.