माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन

नाशिक,दि.१० एप्रिल :- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला माजी खासदार समीर भुजबळ यांनी फुले स्मारक मुंबई नाका येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्षा कविता कर्डक, मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,प्रसाद सोनवणे, अमोल नाईक, आशा भंदूरे, शंकर मोकळ, अमर वझरे, आकाश पगार, नाना साबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने फुले स्मारक मुंबई नाका परिसरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.