नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन माेहिम

नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन माेहिम
नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन माेहिम

नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन माेहिम यशस्वीपणे पुर्ण करण्यात आली.

नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेने नाशिक महानगपालिकेच्या बहुमोल अशा सहकार्याने आणि संस्थेच्या पदाधिका-यांच्या व लोक सहभागातुन रामकुंड,पंचवटी येथे सातत्यपुर्ण असे  गणेशमुर्ती व निर्माल्य संकलनाचे हे 13 वे वर्ष पुर्ण केले.

यावर्षी नाशिककर नागरीकांनी ऊस्फुर्त असा प्रतिसाद देत गणेश मुर्तींचे दान करुन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. तसेच संस्थेच्यावतीने नागरीकांना  शाडु मातीच्या गणेश मुर्तीची स्थापना का करावी यांचे प्रबोधन केले गेले.तसेच पुढील वर्षी शाडु मातीच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले. 

गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन मोहिमे करीता नाशिक मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास रबाडिया साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.पोलिस अधिकारी प्रियंका बागुल मँडम, मनपाचे मा.संजय जमधाडे,गंगा परीसर सुपरवायझर वैशाली पगारे मँडम,मनपा व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने आजची गणेशमुर्ती संकलन मोहिम यशस्वी करण्यात आली. सर्व गणेशमुर्ती व निर्माल्य बांधकाम विभागाकडे सुपूर्त करण्यात आले.

या मोहिमे प्रसंगी संस्थेचे विश्वस्त बाळक्रुष्ण जाधव, योगेश बर्वे,अध्यक्ष रोहित कानडे, सचिव प्रकाश सुर्यवंशी,राजेंद्र देवकर, खजिनदार शेखर चव्हाण, विश्वस्त प्रकाश बर्वे,रविंद्र रुद्राक्ष,सुदेश जाधव,चेतन कानडे, रोहन रुद्राक्ष, प्रथमेश रुद्राक्ष,सागर जाधव,आदित्य नाथ, अभिषेक चव्हाण, प्रशांत चव्हाण,तन्मय इंगळे, दत्ता सुर्यवंशी व संस्थेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, हितचिंतक उपस्थित होते.