सगुणा फाउंडेशन ग्रुप व पी. डी.गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या वतीने आय. एस. पी. व सी. एन. पी नोटप्रेसमध्ये भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सगुणा फाउंडेशन ग्रुप व पी. डी.गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या वतीने आय. एस. पी. व सी. एन. पी नोटप्रेसमध्ये  भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सगुणा फाउंडेशन ग्रुप व पी. डी.गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या वतीने आय. एस. पी. व सी. एन. पी नोटप्रेस अंतर्गत स्वर्गीय कामगार नेते पी. डी. गांगुर्डे नाना यांच्या स्मरणार्थ गेल्या आठ वर्षांपासून कामगार व कामदार यांच्यात सामाजिक दृष्ट्या एकात्मता व कामगार ऐक्य सलोखा टिकवावा या दृष्टिकोनातून भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाशिक रोड यू.एस.जिमखाना येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन प्रेसचे जनरल मॅनेजर राजेश बन्सल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी प्रेसचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्नरे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, श्री. समर्थ बॅंकेच व्हा. चेअरमन राजेश गांगुर्डे, राजस ग्रुप चे संचालक राजेश उपासनी, कार्तिक डांगे, प्रविण बनसोडे, नितीन तेजाळे, तसेच पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व सगुणा बहुउद्देशीय संस्थेचे दत्ता गांगुर्डे, राहुल रामराजे, संदीप गांगुर्डे, प्रकाश सोनवणे ,सुधीर गायकवाड, गणेश कळमकर हे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी जनरल सेक्रेटरी गोडसे यांनी स्वर्गीय पी. डी. गांगुर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत पी. डी गांगुर्डे यांनी प्रेस कामगारांसाठी कामगारांच्या वारसांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करून मयत, अनफिट सारखे प्रश्न घेऊन यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न करून त्यांचे प्रश्न सोडविले. तसेच प्रेस कामगारांसाठी असणारी नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी पतपेढी म्हणून ओळखली जाणारी पतसंस्थेची इमारत पी. डी. गांगुर्डे यांनी त्यांच्या कारकिर्दीत उभारली आहे. अशी अनेक भरीव कामे त्यांनी कामगारांसाठी केली आहेत. असे गोडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.