डॉ. राम कुलकर्णी यांच्या शंभराव्या पुस्तकाचे मंगळवारी २४ मार्च रोजी प्रकाशन....

डॉ. राम कुलकर्णी यांच्या शंभराव्या पुस्तकाचे मंगळवारी २४ मार्च रोजी प्रकाशन....

नाशिक :-   गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव आणि प्रसिद्ध लेखक डॉ. राम कुलकर्णी यांच्या शतक महोत्सवी शंभराव्या पुस्तकाचे " जीवन समृद्धीचा महामार्ग" या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि.२४ मार्च रोजी शर्मन हॉल, गुरुदक्षिणा सभागृह इमारत येथे सकाळी साडे दहा वाजता होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत . या कार्यक्रमात स्व. डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्री. प्रकाश पाठक यांचे ' समृद्ध जीवन कसे जगावे ' या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना स्वयंविकास पुरस्कार आणि सानिका महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वयंविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. राम कुलकर्णी आणि सानिका प्रकाशनचे संचालक श्री. सागर कुलकर्णी यांनी केले आहे.