डॉ राम कुलकर्णी यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन...

डॉ राम कुलकर्णी यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन...

नाशिक--     गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव आणि प्रसिद्ध लेखक डॉ राम कुलकर्णी यांच्या शतक महोत्सवी शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ दीप्ती देशपांडे आणि प्रसिद्ध वक्ते श्री प्रकाश पाठक यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वयंविकास प्रबोधिनी आणि सानिका प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. जीवन समृद्धीचा महामार्ग हे डॉ राम कुलकर्णी यांचे शंभरावे पुस्तक समाजाला समृद्ध जीवन कसे जगावे याचे प्रभावी प्रबोधन करेल असे प्रतिपादन या प्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ सौ दीप्ती देशपांडे यांनी केले. याप्रसंगी डॉ राम कुलकर्णी आणि प्रा सौ नीता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या सहा चरित्र पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना स्वयंविकास पुरस्कार आणि सानिका महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांची नावे खालील प्रमाणे :-

श्री भास्कर आचार्य - जीवन गौरव पुरस्कार 

डॉ आनंद पाटील - वैद्यकीय क्षेत्र 

श्री हेमंत पाठक - सामाजिक क्षेत्र 

श्री हर्षद बेले - उद्योग क्षेत्र

श्री मुकुल कुलकर्णी - पत्रकारिता क्षेत्र 

श्री ऋषिकेश खैरे - सामाजिक न्याय क्षेत्र 

सुप्रेम फाउंडेशन डॉ प्रशांत भुतडा - संस्था पुरस्कार 

आचार्य तुषार भोसले - आध्यात्मिक क्षेत्र 

सौ मंगला कलंत्री - महिला सबलीकरण क्षेत्र 

सौ आसावरी देशपांडे - महिला सक्षमीकरण क्षेत्र 

श्रीमती रश्मी पोतदार - साहित्य क्षेत्र 

डॉ विद्या देशपांडे -- योग प्रशिक्षण क्षेत्र

सौ ज्योती आव्हाड - दिव्यांग क्षेत्र

      श्री सागर कुलकर्णी आणि प्रा सौ विनिता कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला.

प्रा जयंत भाभे यांनी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा परिचय करून दिला. डॉ अनिल सावळे यांनी आभार मानले. डॉ स्नेहा रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले. आचार्य तुषार भोसले यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरां तर्फे आपले मनोगत व्यक्त केले.