सोमेश्वर कॉलनी, सातपूर येथे महिला दिन साजरा

सोमेश्वर कॉलनी, सातपूर येथे महिला दिन साजरा
सोमेश्वर कॉलनी, सातपूर येथे महिला दिन साजरा

8 मार्च 2024  रोजी सोमेश्वर कॉलनी, सातपूर येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.  सौ दिपाली पिंगळे , सौ रेखा पजई, 

श्री मंगेश घोलप  यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला . यामुळे इतर महिलांनीही प्रेरित होऊन स्वतःच्या हक्काचा छोटा मोठा का होईना व्यवसाय करावा व ज्यांचा व्यवसाय सुरू आहे त्यांनी आपला व्यवसाय दहा पट कसा वाढवता येईल, यासाठी कुठली कौशल्य अवगत करायला हवी आणि व्यवसाय व विक्री व्यवस्थापनातील टप्पे यावर उद्योजकीय प्रशिक्षक सौ लिला हर्षद सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.  तसेच आपली उत्पादने व सेवा विक्रीसाठी उपलब्ध असलेले पर्याय ही त्यांनी सुचवले.  श्री व सौ  मंगेश घोलप यांचे माता-पिता व सौ  दिपाली पिंगळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरता विशेष परिश्रम घेतले. उपस्थित महिलांनी व उद्योजकांनी आयोजकांचे आभार मानले.