आश्रम शाळा वेलुंजे येथे बँकिंग साक्षरता कार्यक्रम उत्साहात

आश्रम शाळा वेलुंजे येथे बँकिंग साक्षरता कार्यक्रम उत्साहात

आज आश्रम शाळा वेलुंजे येथे बँकिंग साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र या जिल्हा अग्रणी बँकेतर्फे आर्थिक साक्षरता सल्लागार श्रीम. अनुराधा लोंढे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहार, बचत, डिजिटल व्यवहार यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे श्री. बोरसे सर यांनी केले. कार्यक्रमाला श्रीम. तारापूरकर मॅडम, विश्वस्त – दि. नाशिक एज्युकेशन सोसायटी, श्री. बी. डी. आहेर सर (शाळा समन्वयक), श्री. बडगुजर सर, चौधरी मॅडम, प्रिया मॅडम (SNSF Nashik), तसेच श्री. उघडे सर (मुख्याध्यापक – माध्यमिक विभाग), श्री. घटकर सर (मुख्याध्यापक – प्राथमिक विभाग) हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, SNSF चे शिक्षक, तसेच सुमारे 250 विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेबद्दल जागृती निर्माण झाली असून, डिजिटल युगात जबाबदारीने आर्थिक व्यवहार कसे करावेत, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.