सामूहिक चंद्र नमस्कार" उपक्रमाच्या प्रथम कार्यशाळेचा "प्रमाणपत्र वितरण सोहळा" दिमाखात संपन्न

सामूहिक चंद्र नमस्कार" उपक्रमाच्या प्रथम कार्यशाळेचा "प्रमाणपत्र वितरण सोहळा" दिमाखात संपन्न

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच नाशिक येथे आयोजित केलेल्या "एक वर्षीय सामूहिक चंद्र नमस्कार" उपक्रमाच्या प्रथम कार्यशाळेचा "प्रमाणपत्र वितरण सोहळा" दिमाखात संपन्न

नाशिक न्यूज:  भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून तिर्थक्षेत्र नाशिक येथे कार्तिक म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा व गुरुनानक जयंती या अद्वितीय मुहूर्तावर रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी भाजप योग प्रकोष्ठ द्वारा डॉक्टर प्रीती त्रिवेदी यांनी आर पी विद्यालय, पंचवटी येथे आज वरील सर्वप्रथम राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील "एक वर्षीय सामूहिक चंद्र नमस्कार" या उपक्रमाची अतिशय उत्साहात सुरुवात केली.

या उपक्रमात सहभागी झालेल्या योग साधक व योग शिक्षकांना आज रविवार, दिनांक ०३ डिसेंबर २०२३ रोजी, सकाळी ९.३० वाजता, हॉटेल रामा हेरिटेज, नाशिक येथे उत्साहपूर्ण व दिमाखात संपन्न झालेल्या श्रमपरिहार व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली.

डॉ. प्रीती त्रिवेदी, संयोजिका - भाजप योग प्रकोष्ठ यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर सर्व श्री डॉ. किशोर थोरात - श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, श्री विलास साबळे - प्राचार्य, किशोर सुधारालय, नाशिक, श्री विजय निपाणीकर - प्रसिद्ध शास्त्रज्ञ व लेखक,  सौ अपूर्वा जाखडी - स्पेस इंजिनिअरिंग, नासा, *श्री उल्हास पाटील - सर्वोच्च सदस्य, आर्ट ऑफ लिव्हिन्ग, योग शिक्षक संघाचे सदस्य - श्री. यु. के. अहिरे सर, श्री सुभाष वाणी सर, श्री उल्हास पाटील सर, व योग शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी या मान्यवरांनी उपस्थित राहुन उपक्रमाची शोभा वाढवली. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आरेखन व सूत्रसंचालन डॉ योगेश कुलकर्णी, संयोजक - चंद्र नमस्कार कार्यशाळा यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ प्रिती त्रिवेदी यांनी केले.

कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला नाशिक व अन्य ठिकाणी वर्षभर सामुहिक चंद्र नमस्कारांचे आयोजन भाजप योग प्रकोष्ठ द्वारा होणार असून विविध संस्था तसेच योग शिक्षक व साधक यांच्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती भाजप योग प्रकोष्ठ द्वारा डॉक्टर प्रीती त्रिवेदी यांनी दिली.

सदर कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व सहकारी योगशिक्षक, योग साधक तसेच सह्याद्री हॉस्पिटल नाशिक, पर्ल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक, मंजुश्री आयुर्वेद, सिल्व्हर आयकॉन (आर्मी सप्लायर्स) , साई एन्टरप्रायजेस नाशिक, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट नाशिक, महिला पतंजली समिती नाशिक, नाशिक पतंजली योग समिती नाशिक या सारख्या विविध क्षेत्रातील नामवंत संस्था तसेच आणि विविध संस्था, मिडिया क्षेत्रातील रेडिओ नमकीन, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप या सारख्या सायबर आणि योग तथा अन्य सर्व क्षेत्रातील मान्यवर यांचे जाहीर आभार भाजप योग प्रकोष्ठ द्वारा डॉ. प्रीती त्रिवेदी आणि डॉ. योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहेत.