श्रमसंस्कार शिबीर लोकजागर कीर्तन बातमी

श्रमसंस्कार शिबीर लोकजागर कीर्तन बातमी

 

शिवराज्याभिषेक क्रांतिकारी घटना
लोणवाडी येथील श्रमसंस्कार शिबीर लोकजागर कीर्तन कार्यक्रमात ह.भ.प.भरत महाराज पानसरे यांचे प्रतिपादन 
पिंपळगाव बसवंत २९.१.२०२४
        राजाच्या सार्वमत्वाची  मान्यता राज्याभिषेकाने प्राप्त होत असे, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक राजमान्यता, धार्मिक, सामाजिक, कायदा,परराष्ट्र व्यवहार, आणि राजाच्या अधिकाराच्या मान्यता दृष्टीने एक क्रांतिकारी घटना होती. तिचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिवराज्यभिषेकामुळे  छत्रपती शिवाजी महाराजांचा कायद्याचा अमल सर्वत्र प्रस्थापित झाला. ह्या सोहळा होऊन ३५० वर्ष झाले.सर्वांनी हा सोहळा साजरा करावा असे प्रतिपादन ह. भ .प. भरत महाराज पानसरे यांनी केले. लोणवाडी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक ३५० वर्षानिमित्त लोकजागर कीर्तन कार्यक्रमात ते शनिवार  दि २७ जानेवारी रोजी बोलत होते. 
      ह.भ.प.भरत महाराज पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे आदर्श राज्य होते. ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठलाही कोणाला हात लावण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांना अधिकार होते. प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी होती. राजेशाहीमध्ये त्यांनी लोकशाही सारखे अधिकार समाजाला दिले. त्यांचे राज्य हे कल्याणकारी आदर्श राज्य होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची फोड करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे अनेक ऐतिहासिक दाखले देत रसाळवाणीतून समाजाचे प्रबोधन केले. आजच्या तरुणांना जसे ३५० वर्षांपूर्वी या मातीतील संपूर्ण भारताला आदर्शभूत समाजव्यवस्था निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकामुळे झाले. तसे आजही त्यांचे विचार खऱ्या अर्थाने समाजात रुजलेली दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांच्यातील आदर्श समाज व्यवस्था त्यांनी यावेळी उलगडून सांगितली. तत्कालीन व्यवस्थेला मिळालेले आदर्श व्यवस्थेत जगण्याविषयीचे भान आजच्या समाजाने घेणे गरजेचे आहे. हे त्यांनी संतांच्या विचारातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्या कीर्तनातून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संतांचे कार्य आजच्या तरुण पिढीने समजून घेऊन त्यांच्या मार्गावर मार्गदर्शन करावे असे विचार त्यांनी मांडले.
        यावेळी ह.भ.प.भरत महाराज पानसरे यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.दिलीप माळोदे यांनी केला. गायनाचार्य ह. भ.प. अक्षय महाराज वाघ, सोपान महाराज खैरनार, मृदुंगाचार्य ह.भ.प अर्जुन महाराज रसाळ, रामदास महाराज रसाळ यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, डॉ. दत्तात्रय फलके, अजित देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व गावातील मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संतांचे कार्य आजच्या तरुण पिढीने समजून घेऊन त्यांच्या मार्गावर मार्गदर्शन करावे केले.
फोटो ओळ 
लोणवाडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात लोकजागर कीर्तन करताना ह.भ.प.भरत महाराज पानसरे, समवेत गायनाचार्य ह. भ.प. अक्षय महाराज वाघ, सोपान महाराज खैरनार, मृदुंगाचार्य ह.भ.प अर्जुन महाराज रसाळ, रामदास महाराज रसाळ व भजनी मंडळी आदी.